Availability: In Stock

Moropantanchi Shlokkekavali | मोरोपंतांची श्लोककेकावली

200.00

ISBN:9789380617732

Publication Date:8/1/2014

Pages:160

Language:Marathi

Description

मध्ययुगीन कवितेच्या परंपरेत संतकवितेनंतर पंडितांच्या काव्यरचना आढळतात. पंडित कवींच्या रचनेत वैविध्य आहे. रसपूर्ण काव्यनिर्मिती, संस्कृत भाषेचा डौल, भाषेची प्रौढता व प्रगल्भता, सरस निर्मिती, पांडित्याचा आविष्कार, मनापेक्षा मेंदूला झुलवण्याची क्षमता, अलंकार-चमत्कृती, शब्दांच्या कसरती, संस्कृतचा आदर्श, सामासिक शब्दांचे प्राबल्य, कारागिरीला महत्त्व, सांकेतिकता इत्यादी गुणदोष या कवितेत दिसून येतात. मोरोपंत याच पंडिती परंपरेने कवी असल्याने त्यांच्या विपुल लेखनातही याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. तथापि ‘श्लोककेकावली’ हा पंतांच्या भक्तीचा उत्कट व प्रभावी आविष्कार आहे. हे आत्मनिष्ठ आणि करुणरम्य भावकाव्य आहे. स्वोद्धारासाठी ईश्वराकडे केलेली मोरोपंतांची आर्त विनवणी, हा या काव्याचा ठळक विशेष आहे.

संतत्व वृत्ती असणाऱ्या एका भगवत्भक्ताचे हे आत्मनिष्ठ काव्य कुणाही मराठी रसिकाला आकर्षित करणारे ठरते. एका पुराणिकाची ही कीर्तनसदृश रचना आहे. पंतांच्या कल्पना आणि भावनांना उठाव देणारे हे काव्य आहे. मोरोपंतांच्या व्यक्तिमत्त्वाची सारी गुणवैशिष्ट्ये ‘श्लोककेकावली’ मधून ठळकपणे जाणवतात. म्हणूनच मोरोपंतांच्या रचनेत या काव्याला स्वतंत्र स्थान आहे. काही शतकांपूर्वी लिहिले गेलेले हे काव्य आजही काव्यरसिकांना तेवढेच टवटवीत वाटते.

Additional information

Book Author