बगळोबाची शाळा

Bagalobachi Shala

प्रकाशक
शब्दालय पब्लिकेशन हाऊस
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
३१
आवृत्ती
First Edition
भाषा
मराठी

₹१८०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

मराठी वाचकांसाठी जितेंद्र कुवर हे नाव आता सुपरिचित आहे. कविता, कथा आणि बालसाहित्य असा त्यांचा बहुरंगी लेखन संचार आहे. संवेदनशील अधिकाऱ्याला प्रशासनाच्या 'फाईली' बाहेरचं जग साद घालीत असतं. त्या हाकेला दिलेला प्रतिसाद म्हणजे कुवर यांचा लेखन प्रपंच आहे. निसर्ग हे त्यांच्या लेखनाचे प्राणतत्त्व आहे 'बगळोबाची शाळा' हा बालकविता संग्रह आहे. आज बालसाहित्य मोठ्या प्रमाणात लिहिलं जातंय. ही आनंदाची गोष्ट आहे तशी जबाबदारीचीही बाब आहे. चांगलं बालसाहित्य लिहिणं हे कठीणच. त्यात पुन्हा आजच्या मुलांची मानसिकता-आकलन-अनुभव विश्व पाहता तमाम लिहिणाऱ्यांपुढे एक आव्हान आहे. आजची मुलं भन्नाट आहेत. कारण त्यांचा भोवताल अफाट आहे.


या संग्रहात कवीने जंगलातल्या पशू-पक्ष्यांचा मेळा भरवला आहे. शाळा बगळ्यांची असली तरी त्यात चिऊ-काऊ, खारू, ससा, मुंगुस, हत्ती, साळू, कासव, मोर, हरीण, साप, पोपट, वाघ, कोंबडा, बकरी, माकड, भालू, कोकिळा, कोल्हा, नाग, फुलपाखरू, किडा, मुंगी असे सगळे सामील आहेत. अर्थात झाडा-वेलींची साथसोबत आहेच. ही अद्भूत शाळा कोंबड्याने बांग दिल्यानंतर भरते. आणि विशेष म्हणजे या शाळेत सगळे आनंदी आहेत. त्यांचा आनंद कायम ठेवायचा असेल तर आपल्याला जंगल जिवापाड जपावं लागेल. असा संदेश देणारी ही कविता लीलया जंगलाचा फेरफटका मारून आणते. कवीचे शब्द अधिकाधिक घनगर्द होवोत या शुभेच्छेसह...


- दासू वैद्य

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर | Jitendra Kuwar

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like