या पुस्तकाविषयी
महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या साठ सहकाऱ्यांसह १८७३ मध्ये स्थापन केलेल्या मानवतावादी 'सत्यशोधक समाजा'च्या जडणघडणीत कृष्णराव भालेकर यांचाही मोलाचा वाटा होता. मुकुंदराव पाटील हे याच कृष्णराव भालेकरांचे सुपुत्र. कृष्णराव भालेकरांना दिलेल्या वचनानुसार मुकुंदरावांनी सोमठाणे येथून शिदोरे बंधूंच्या सहकार्याने 'दीनमित्र' हे सत्यशोधकीय साप्ताहिक १९१० मध्ये पुन्हा सुरू केले; व ५८ वर्षे अविरतपणे चालविले. या सत्यशोधकीय पत्राने आपल्या उद्दीष्टांनुसार बहुजनांच्या समस्यांना मुखर करत समाजामध्ये सत्यशोधकीय विचारांची पेरणी केली. मुकुंदरावांनी या पत्रातून शिक्षणाचा जागर केला. बहुजन समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मुकुंदरावांनी अग्रलेखांच्यासोबत विविध सदरांमधून व साहित्यप्रकारांमधून लेखन केले. मुकुंदरावांचे हे साहित्य आजही समकालीन ठरते. असे हे मौलिक साहित्य बराच काळ अनुपलब्ध होते. आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने हे सत्यशोधकीय साहित्य प्रकाशित होत आहे. वाचक त्याचे नक्कीच स्वागत करतील, असे वाटते!
उत्तमराव माधवराव पाटील
मुख्य संपादक
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे दुर्मिळ वाड्मय खंड तिसरा
संपादन: Pra. Do. Sudhakar Shelar, Shri Uttamrao Patil
₹२७६
तर्कटपंजरी
₹१५०