कालकल्लोळ

Kalkallol

लेखक अरुण खोपकर
प्रकाशक
Majestic Publication House
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
४००
आवृत्ती
1
ISBN
9788195338078
भाषा
मराठी

₹८५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कालकल्लोळ' हा अरुण खोपकर यांच्या विविध कलाविचारांचा 'अनुनाद' नंतरचा टप्पा आहे. 'विस्तारणारी वर्तुळे'तल्या लेखांत बहुरंगी घटनांचा, स्थळांचा व व्यक्तीचा एक पट मांडला आहे. साठोत्तरीच्या मुंबईपासून उलगडता उलगडता, तो सत्तरीच्या कसौलीतल्या राष्ट्रीय कलासंगमातून, ऐशीच्या पॅरिसमधल्या 'फेस्टिव्हल ऑफ इंडिया' पर्यंत पोचतो. यात अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, दिलीप पाडगांवकर, आर. के. लक्ष्मण, नाटकवाले, संगीतकार, नर्तक, संतमहंत, विचारवंत आणि विक्षिप्त अशा अनेकांची हृद्य शब्दचित्रे आहेत. मुंबईच्या बेकायदेशीर दारूगुत्त्यांपासून पॅरिसच्या बिस्त्रोपर्यंतची चित्रविचित्र स्थळचित्रे आहेत. खोपकरांच्या विस्तारित होणाऱ्या कलाजाणिवांशी आणि ज्ञानकक्षांशी संबंधित असलेल्या या लेखनात, समकालीन सांस्कृतिक इतिहासाच्या खाणाखुणाही प्रभावीपणे प्रकटलेल्या आहेत. 'तीन किरणकेंद्रे'तल्या पहिल्या लेखात आपल्या 'अधोनाट्य-नाट्य-ऊर्ध्वनाट्य' या नवसंकल्पनेच्या आधारे खोपकर सतीश आळेकरांच्या नाटकांकडे पाहतात. दुसऱ्यात 'संत तुकाराम' या 'प्रभात'च्या कालजयी चित्रपटाची सोदाहरण उकल करतात. तिसऱ्यात ते अरुण कोलटकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतात आणि साहित्यसमीक्षेला अनोख्या असलेल्या दृष्टिकोनांतून, आतापर्यंत न जाणवलेली काव्यवैशिष्ट्ये नजरेसमोर आणतात. अंतरंगातून खळाळून वाहणारा भाषेचा व समृद्ध विचारांचा प्रवाह या सर्व लेखांना जोडतो. खोपकर हे चित्रपट, साहित्य, संगीत, चित्रकला, स्थापत्यकला, लोककला इत्यादींचे, अनेक भाषांचे व संस्कृतींचे, मर्मज्ञ जाणकार आहेत. सहज संवादी भाषा आणि अधूनमधून येणाऱ्या अंतःस्फूर्त भाष्यांमुळे हे पुस्तक आधीच्या 'अनुनाद' या पुस्तकाप्रमाणेच वाचनाची आंतरिक सक्ती करणारे ठरावे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like