या पुस्तकाविषयी
सांगनं नही पन सांगनं वनं हे डॉ. दिलीप धोंडगे यांचे अहिराणी भाषेतील पहिलेच ललितगद्य लेखन आहे. ते मोहक तर आहेच; पण भावकल्लोळ निर्माण करणारे शक्तिमान कथन आहे. या लेखनात 'सांगणे' ही क्रिया अतिशय उत्फुल्ल बनलेली आहे. सांगितल्याशिवाय राहवत नाही, गोष्ट पोटात ठेवता येत नाही अशी अपरिहार्य कथानात्मता या लेखनाला लाभलेली आहे. सांगणाऱ्याची अधीरता ऐकणाऱ्यामध्येही निर्माण होते. सांगणारा ऐकणाऱ्याला सारखा आपल्या बरोबर घेतो. सांगण्याचा ओघ अखंड आहे. माणसांबद्दलचे, गुराढोरांबद्दलचे, शेताबद्दलचे, शाळेबद्दलचे, मित्रांबद्दलचे, नात्यातले आणि नाते निर्माण झालेल्या असे कोणाही बद्दलचे 'स्व' चे आकलन आहे. या लेखनाचे प्रकट वाचन अत्यंत आनंददायी व अहिराणी बोलीरूपाचा प्रत्यय देणारे घडू शकते. त्यात खेड्यातले नाट्य, हास्य, सुखदुःख आहे. जगणे, बहरणे, मोडून पडणे आणि परिस्थितीशी सामना करीत पुन्हा उभे राहणे आहे. या साऱ्या सांगण्यातले नाट्य उभे करणारा निवेदक संयतपणे, समंजसपणे खेड्याकडे पाहतो. स्वतःला प्रकट करताना अहिराणी प्रदेशातील संस्कृतिरूपांना 'स्व'मध्ये सामावून घेतो. मुले माणसे, प्राणी, शेती- माती या सर्वामध्ये स्वतःला विसर्जित करतो. सर्जनशीलतेचा देशी प्रत्यय देतो. हे लेखन वाचल्यावर हे सारे सांगण्यालायक, सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे आहे. अहिराणी भाषेचे पांग फेडणारे हे पहिलेच समर्थ व स्वाभाविक गद्य आहे.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
लेखकाविषयी
डॉ. दिलीप धोंडगे यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
सन्मान
शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण!
शब्दालय प्रकाशित डॉ. दिलीप धोंडगे यांच्या ‘सांगनं नही पण सांगनं वन’ या साहित्यकृतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)…
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, महाराष्ट्र