Adivasi Lokkathamemansa

See more images

Marathi Folklore

Adivasi Lokkathamemansa

आदिवासी लोककथामीमांसा

Publisher
Shabdalaya Prakashan
Language
Marathi

₹160

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आमचे बालपण पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या 'नेटाळी' या गावी गेले. या गावातले आमचे मित्र, मैत्रिणी म्हणजे वारली, मल्हार कोळी, ठाकर या आदिवासींच्या जमातीमधील आहेत. आम्ही शाळेतून, महाविद्यालयातून आल्यानंतरचे आमचे जग म्हणजे जंगलात, शेतात काम करणाऱ्या आदिवासी काका-काकू, दादा-बाय यांच्याबरोबर मजा- मस्करी, काम करण्यात जात असे. रात्री आम्हाला आमचे वडील उत्कृष्ट गोष्टी ऐकवत असत. लाडक्या काका भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळेच मला कथेचा छंद जडला. या काळात आम्ही भावंडे आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक रूपात एकरूप झालो. पदव्युत्तर संशोधनासाठी मी 'ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे लोकसाहित्य संकलन व तुलनात्मक अभ्यास' या विषयावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. माझी बहीण मीनाक्षी सामंत हिनेसुद्धा संशोधनासाठी आदिवासी लोककथांच्या संकलनाला सुरुवात केली. या काळात आम्ही झपाटल्याप्रमाणे काम केले. आणि लोकसाहित्याचे प्रमाणाच्या बाहेर संकलन केले. त्याची पुन्हा नव्या अभ्यास पद्धतींनी मांडणी केली आणि 'आदिवासी लोककथामीमांसा' या ग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथात आदिवासी लोककथांचा अभ्यास करताना मानसशास्त्रीय पद्धती, आदिबंधात्मक पद्धती आणि कथनमीमांसा यांचे उपयोजन केले आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Dr. Anjali Mascarenhas

डॉ. अंजली मस्करेन्हस | Dr. Anjali Mascarenhas

View Full Profile
डॉ. अंजली मस्करेन्हस यांची पुस्तके

More by Dr. Anjali Mascarenhas

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा