Avkash

See more images

Avkash

अवकाश

लेखक Sania | सानिया
Publisher
Mouj Prakashan Gruh
Language
Marathi

₹125

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

एका मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ, तामीळ कुटुंबातील जान्हवीची, 'अवकाश' ही कथा. केवळ स्त्रीचा जन्म पदरी पडल्यामुळे, स्वकीयांनी आणि समाजाने अनेक बंधनांत वाढवलेल्या आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेने आयुष्यक्रमणा करणाऱ्या अनेक स्त्रियांचे, 'जान्हवी' हे प्रातिनिधिक रूप. आयुष्यातले अनेक अनुभव, जान्हवीला अचानकपणे स्वतःचीच ओळख घडवतात. आणि नवीन होऊन आलेली लेखिका जान्हवी राघवन स्वतः पुढेच उभी ठाकते. 'स्थलांतर', 'आवर्तन' या सानिया यांच्या आधीच्या कादंबऱ्यांतून, जीवनाच्या वेगवेगळ्या कोनांतून चाचपडत चाललेली, स्व-सामर्थ्याच्या जाणिवांनी सजग होत जाणारी स्त्री-तिचे आत्मभान यांचा प्रतीकात्मक शोध, 'अवकाश' मधेही आहे-मात्र नव्या परिमाणांच्या उपस्थितीने अधिक प्रगल्भ, व्यापक आणि समर्थपणे व्यक्त झालेला.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

सानिया | Sania

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा