या पुस्तकाविषयी
About this book
'कविता १९६९-१९८४' हा विलास सारंगांचा पहिला मराठी कवितासंग्रह. 'सत्यकथा', 'मौज', 'अभिरुची', 'प्रतिष्ठान', 'अबकडई', 'अनुष्टुभ', 'संदर्भ', 'लोकवाङ्मय' इत्यादी नियतकालिकांमध्ये त्यातल्या कविता प्रथम प्रकाशित झाल्या होत्या.
सारंगांच्या इंग्रजी कवितांचा संग्रह मात्र मराठीतल्यापूर्वीच, १९७८ साली कलकत्त्याहून 'ए काइंड ऑफ सायलन्स' या नावाने प्रसिद्ध झाला. 'कविता १९६९-१९८४' मधील काही कवितांची इंग्रजी रूपे त्या संग्रहात समाविष्ट झाली आहेत.
या काव्यसंग्रहापूर्वी सारंगांची चार मराठी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी 'सोलेदाद' (कथासंग्रह, १९७८) आणि 'एन्कीच्या राज्यात' (कादंबरी, १९८३) ही 'मौजे'ने प्रसिद्ध केलेली. शिवाय 'सिसिफस आणि बेलाक्वा' व 'मराठी नवकादंबरी' ही दोन समीक्षापुस्तके १९८३ साली प्रसिद्ध झाली आहेत.
डब्ल्यू. एच. ऑडन यांच्या काव्यावर प्रबंध लिहून १९६९ साली मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळवणारे विलास सारंग सध्या मुंबई विद्यापीठात इंग्रजी साहित्य शिकवीत आहेत. मधल्या काळात त्यांनी 'इंग्रजी-मराठी साहित्यानुवादाचे शैलीविषयक पैलू' या विषयावर प्रबंध लिहून अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाची पीएच. डी. घेतली, आणि इराकमध्ये बसरा विद्यापीठात त्यांनी पाच वर्षे इंग्रजी साहित्याचे अध्यापन केले. त्यांच्या कथांचे अनुवाद युरोपियन, अमेरिकन व कॅनेडियन नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
हे सर्व करताना झालेल्या शारीरिक, बौद्धिक व भावनात्मक स्थलांतराच्या खुणा प्रस्तुत कवितासंग्रहात सापडू शकतील.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
विलास सारंग यांची पुस्तके
View all
More by Vilas Sarang
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books