Lihitya Lekhakache Wachan

See more images

Lihitya Lekhakache Wachan

लिहित्या लेखकाचं वाचन

Publisher
Shabd Publication
Published
2011
Pages
160
Language
Marathi

₹160

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

मराठी समीक्षेच्या प्रचलित प्रवाहांमध्ये सहजासहजी सामावून जाणार नाही अशी समीक्षा डॉ० विलास सारंग गेली काही वर्षे लिहीत आहेत. तीव्र कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि साहित्यकृतीवर रोखलेली नजर या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे सवयीच्या गोष्टींमधूनही त्यांना काहीतरी नवे जाणवत राहते. डॉ० सारंगांना अनेक गोष्टींबद्दलकुतूहलही वाटते. साहजिकच एरव्ही समीक्षेच्या क्षेत्रात प्रवेश नाकारलेली अनेक नवी आशयसूत्रे त्यांच्या समीक्षेत प्रवेश करतात आणि तिला ताजेपणा व वैविध्य देतात. 'सूक्ष्म वाचना'ची पद्धती डॉ० सारंगांना विशेष प्रिय आहे. तथापि, या पद्धतीला अनेकदा ते विशिष्ट संहितेच्या सीमारेषांपलीकडे घेऊन जातात. अनेकदा समाजवास्तव हीच त्यांची 'संहिता' ठरते. सैद्धान्तिक समीक्षा आणि प्रत्यक्ष समीक्षा यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या संकराला भोवतालच्या समाजवास्तवाचे आणि स्वतःच्या सर्जनशीलतेचे दुहेरी परिमाण डॉ० सारंग प्राप्त करून देतात. सखोलता आणि व्यामिश्रता यांच्याशी किंचितशीही तडजोड न करता अनौपचारिक शैलीची सहजता साधल्यामुळे त्यांची समीक्षा संवादसुलभ आणि वाचनीय होते. 'लिहित्या लेखकाचं वाचन'मधून डॉ० विलास सारंग यांच्या समीक्षालेखनाची ही सर्व वैशिष्ट्ये पुन्हा एकदा प्रकट झाली आहेत.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Vilas Sarang

विलास सारंग | Vilas Sarang

View Full Profile
विलास सारंग यांची पुस्तके

More by Vilas Sarang

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा