Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana

See more images

Marathi Health

Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana

निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली : आपले अंतर्मन

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
237
Edition
First Edition
ISBN
9789348054203
Language
Marathi

₹400

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आपल्या आतला डॉक्टर आपणच शोधूया !


देहाच्या व्याधींवर मनाचे औषध देणारे, आपल्या आतल्या डॉक्टरला जागा करणारे आणि आरोग्याचा नवा प्रकाश देणारे हे पुस्तक म्हणजे विज्ञानाची मर्यादा जिथे संपते तिथून सुरू होणारी अंतर्मनाची एक अथांग गाथा आहे. एका डोळ्याची दृष्टी अचानक गेली असताना केवळ सकारात्मकतेच्या बळावर डोळ्यांत पुन्हा चैतन्याचे दीप लावणारे डॉ.


गजानन पाटील यांचा हा प्रवास मानवी जिद्दीचे जिवंत प्रमाण आहे. आपल्या शरीराला जडणाऱ्या व्याधींचा उगम जर मनात असेल तर त्याचे उत्तरही त्याच मनात दडले आहे हे लेखकाने या ग्रंथातून सिद्ध केले आहे. मेंदूच्या सॉफ्टवेअरमधील नकारात्मकता पुसून आरोग्याचे नवीन रीप्रोग्रामिंग करणारी ही एक संजीवनीच आहे. न्यूरोप्लास्टिसिटी आणि सायकोन्यूरोइम्युनोलॉजी यांसारख्या कठीण वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या मराठी भाषेत मांडतानाच व्हिजुअलायझेशन आणि कृतज्ञता डायरी यांसारख्या साधनांतून लेखकाने स्वतःला घडवण्याचा एक वेगळा मार्ग दाखवला आहे. औषधांच्या कडू गोळ्यांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवून स्वयं आरोग्याचा सोहळा साजरा करण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या संग्रही असायलाच हवे आता वेळ आली आहे आपल्या आतील डॉक्टराला जागृत करून मनाचा शरीराशी सुसंवाद करण्याची. कारण आरोग्याची ही गुरुकिल्ली हाती घेताच अनारोग्य पळून जाईल आणि एक निरामय आरोग्य मिळेल. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. गजानन पाटील यांनी तुमच्या आरोग्याचा पासवर्ड आता तुमच्याच अंतर्मनातून कसा बाहेर काढायचा हे दाखवून दिले आहे. चला तर मग आपल्या आतला डॉक्टर आपण शोधून निरामय आरोग्य जगूया !

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana — highlight Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana — highlight Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana — highlight Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana — highlight Nirogi Arogyachi Gurukilli : Apale Antarmana — highlight
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. गजानन पाटील | Dr. Gajanan Patil

View Full Profile
डॉ. गजानन पाटील यांची पुस्तके

More by Dr. Gajanan Patil

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा