प्रकाशन सोहळाBook launch २ मिनिटांचे वाचन 2 min read

विद्याधर पुंडलीक : व्यक्ती आणि वाङ्मय ‘Vidyadhar Pundalik: Vyakti Ani Vangmay’ by Dr. Keshav Tashi Launched in Kolhapur

डॉ. केशव ताशी यांच्या विद्याधर पुंडलीक यांच्यावरील समीक्षाग्रंथाचे प्रकाशन २४ फेब्रुवारी २०२४ रोजी शाहू स्मारक, कोल्हापूर येथे डॉ. अविनाश सप्रे यांच्या हस्ते; अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर.

Dr. Keshav Tashi’s critical study of the writer was released by Dr. Avinash Sapre on 24 February 2024 at Shahu Smarak, Kolhapur, with Dr. Ashok Chousalkar presiding.

प्रकाशक : शब्दालय प्रकाशन

लेखक : डॉ. केशव ताशी

ग्रंथ : ‘विद्याधर पुंडलिक : व्यक्ती आणि वाङ्मय’

शब्दालय प्रकाशनतर्फे डॉ. केशव ताशी लिखित ‘विद्याधर पुंडलिक : व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ २४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाला. ग्रंथाचे प्रकाशन मा. डॉ. अविनाश सप्रे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. अशोक चौसाळकर होते.


या ग्रंथाचे प्रकाशन मा. डॉ. अविनाश सप्रे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. अशोक चौसाळकर होते.


कार्यक्रमाचे तपशील

दिनांक : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

स्थळ : कॉन्फरन्स हॉल, शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर

या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने विद्याधर पुंडलिक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा वेध घेणाऱ्या ग्रंथाचे वाचकांसमोर औपचारिक प्रकाशन करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.

निबिड अरण्यात शिरून आपल्या पावलांच्या ठशांनी नव्या वाटा निर्माण करणारा, मोजकेच पण मौलिक लेखन करणारा लेखक ही विद्याधर पुंडलीक यांची ओळख 'चक्र' या एकांकिकेतील मूल्यानुभव 'माता द्रौपदी'त संक्रमित करुन तिला मातृपद प्रदान करणारा बालमनाचे विलोल विभ्रम, ओंजळीत भरताना त्यांना प्रौढाच्या जरठ मनामनगटाने न हाताळणारा मानसशिल्पी. मृत्यू या पूर्ण विरामात शिरताना ज्याचे चिंतन श्रेय-प्रेयाच्या चिंतनाशी सलगी करतं ते प्रज्ञावंत पुंडलीक. नवकथाकारांच्या बहर पर्वात आपला स्वायत्त स्वर जपणारा आणि कथा रचनेचे बांधकाम मृगजळातलं नसतं, ते असतं एका बेलाग जलदुर्गाचं, हे साक्षांकित करणारा कथाकार. अस्तित्व पोखरणारे एकाकीपण, अस्तित्व नामशेष करणारा मृत्यू या विषयीचं डोह खोल चिंतन बोलकं करणारा बहुपिंडी आणि बहुपेडी साहित्यिक म्हणजे पुंडलीक. त्यांच्या वाङ्मयाचा काटेतोल विमर्ष डॉ. केशव ताशी यांनी घेतला आहे. गुण-दोष दिग्दर्शनही त्यांनी संयमाने आणि समीक्षेतल्या संज्ञासंकल्पनांचे जंजाळ अव्हेरून केलं आहे. डॉ. केशव ताशी यांच्या या लेखनात उद्योन्मुख समीक्षकाचा पायरव जाणवतो.

.‘Vidyadhar Pundalik: Vyakti ani Vangmay’ by Dr. Keshav Tashi Launched in Kolhapur’

‘Vidyadhar Pundalik: Vyakti ani Vangmay’, written by Dr. Keshav Tashi and published by Shabdalaya Prakashan, was formally launched in Kolhapur on Saturday, 24 February 2024.

The book launch ceremony was held at the Conference Hall, Shahu Smarak, Dasara Chowk, Kolhapur, at 5:30 PM. The book was released by Dr. Avinash Sapre, while Dr. Ashok Chousalkar presided over the programme.

The event brought Vidyadhar Pundalik’s personality, literary vision and contribution to Marathi literature into focus and provided readers with an opportunity to engage with Dr. Keshav Tashi’s critical study of this distinctive Marathi writer.

A Critical Study of Vidyadhar Pundalik’s Literary World

Vidyadhar Pundalik is presented as a writer who created his own path through a relatively small but original and significant body of work. His literature is marked by an independent voice, psychological depth and a serious engagement with fundamental questions of human existence.

The source particularly draws attention to works such as ‘Chakra’ and ‘Mata Draupadi’, while highlighting Pundalik’s ability to explore childhood, human psychology, loneliness, mortality and the deeper tensions of existence with unusual sensitivity.

At a time when the Marathi Navkatha tradition was flourishing, Pundalik retained a distinct and autonomous literary identity. His stories are described as carefully structured rather than superficial, with a depth comparable to a strong and layered architectural form.

Themes such as existential loneliness, death, human values, psychological complexity and inner conflict give his writing a multidimensional character and make his contribution significant in the study of modern Marathi literature.

Dr. Keshav Tashi’s Assessment of Pundalik

In ‘Vidyadhar Pundalik: Vyakti ani Vangmay’, Dr. Keshav Tashi examines Pundalik’s literature with a balanced critical approach.

The study considers both the strengths and limitations of the writer’s work without becoming overly dependent on complicated critical terminology. This accessible yet analytical approach gives the book value for students, researchers, critics and readers interested in Marathi literary criticism.

The source also presents Dr. Keshav Tashi’s writing as showing the promise of an emerging literary critic, particularly through the careful way in which he evaluates Vidyadhar Pundalik’s literary personality, narrative technique and philosophical concerns.

शेअर कराShare

या घडामोडीतील पुस्तकेBooks in this story

संबंधित व्यक्तीPeople

संबंधित घडामोडीRelated stories

प्रकाशन सोहळा Book launch

अनाहिता

निमा बोडखे यांची ‘अनाहिता’ ही कादंबरी जातपंचायत, कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथा आणि स्त्रीच्या सन्मानाचा प्रश्न मांडते; प्रकाशन विदर्भ साहित्य…

‘Anahita’ by Nima Bodkhe: A Novel on Womanhood, Dignity and Caste Panchayats

Nima Bodkhe’s novel confronts virginity testing and the caste panchayats that impose it, and was launched at the Vidarbha Sahitya Sangh, Nagpur.

अमेय दालन, चौथा मजला, सांस्कृतिक संकुल,विदर्भ साहित्य संघ,झा

प्रकाशन सोहळा Book launch

गोतावळा

ज्येष्ठ लेखिका श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या २४ व्यक्तिचित्रांचा संग्रह ‘गोतावळा’ शब्दालय प्रकाशनतर्फे २० डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित.

‘Gotavala’ by Shraddha Belsare-Kharkar: 24 Portraits of People Met Along the Way

Published on 20 December 2023, the collection sketches 24 people from politics, administration and literature whom the author met in her…

प्रकाशन सोहळा Book launch

ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत ‘प्रतिवृत्तांत’ ग्रंथाचे प्रकाशन

रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीला वाचकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या निवडक नोंदींचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या…

‘Prativruttant’ Released in the Presence of Eminent Marathi Literary Figures

‘Prativruttant’, a volume documenting the remarkable reader response to Rangnath Pathare’s novel ‘Satpatil Kulvruttant’, was released on 10 May 2024…

सर्व कार्यक्रमAll Events पुस्तके पाहाBrowse the books