Aapatti Nivaran : Part Three Khand 25

See more images

Aapatti Nivaran : Part Three Khand 25

आपत्ती निवारण : भाग तीन खंड २५

Publisher
Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
Published
2020
Pages
211
Language
Marathi

₹60

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

सयाजीराव महाराज बडोदा राज्यातील आपत्तींना यशस्वीपणे सामोरे गेले. त्यांना हे का शक्य झाले याचा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे त्यांनी केलेले प्रशासनाचे सुयोग्य व्यवस्थापन, त्यांनी जगभरातील अनेक विषयांतील तज्ज्ञांना बडोद्यात आणले. अनेक गुणवंतांना वेगवेगळ्या अधिकार पदांवर नेमले. त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ व्यक्ती संबंधित खात्यांवर असल्याने त्यांना अधिक सूक्ष्मपणे नियोजन करता आले. प्रत्येक आपत्तींत या संबंधाने वेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे सर्व कामांचा निपटारा अधिक वेगाने होत गेला. प्रजेला संकटकाळात लवकरात लवकर मदत मिळून दिलासा मिळत गेला. सयाजीराव महाराजांनी प्लेगची साथ, दुष्काळ आणि अतिवृष्टी या संकटांच्या काळात प्रजेला आधार दिला. अनेक वेळा स्वतः आपत्तींची पाहणी केली. बाधित प्रजेला धीर दिला. त्यांना आवश्यक असणाऱ्या जीवनोपयोगी बाबींचा पुरवठा केला. त्याचबरोबर पुन्हा अशा स्वरूपाचे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या. महाराजांनी संकट काळात दिलेली मदत आणि केलेल्या उपाययोजना याचे अवलोकन केले असता एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते ती म्हणजे महाराजांनी दुष्काळात तत्कालीन गरजांना प्राधान्य दिलेच; त्याचबरोबर अशा संकटांवर मात करण्यासाठी दूरदृष्टीने दीर्घकालीन उपयोगी ठरणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले. अशा संकटांकडे राज्यावरील आपत्ती म्हणून न पाहता शाश्वत सुधारणेची संधी म्हणून पाहिले.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. राजेंद्र मगर | Dr. Rajendra Magar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा