या पुस्तकाविषयी
About this book
पारवा
जी. ए. कुलकर्णी
''निळासावळा', 'पारवा' व 'हिरवे रावे' हे जी.ए. यांचे पहिले तीन कथासंग्रह... या साऱ्या कथांतून जी.ए. जीवनाची अस्तित्वमात्रता, त्याची अटळता, त्याची अर्थरहितता, असंबद्धता आणि त्यातील कार्यकारणहीनता हे सारे तर उभे करतातच, पण त्याबरोबरच आपण जिला सहजप्रवृत्ती म्हणतो, वासना किंवा प्रेरणा म्हणतो त्या शक्तीने मानव हे जीवन कसे जगू व बदलवू पाहतो याचेही अनन्य दर्शन घडवितात.
एका बाजूला अनेक रंग, आकार, ध्वनी आदींनी पसरलेले हेतुहीन, आंधळे, सामर्थ्ययुक्त विश्व व दुसऱ्या बाजूला मानवी मूलप्रेरणा... यांच्यातील अत्यंत गुंतागुंतीची नाती व भाऊबंदकी तर जी.ए. दाखवीत नाहीत ना?... काम, क्रोध, द्वेष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मिकपणे विझून जाणारी माणसे जी.ए. यांच्या कथेत पुनः पुन्हा दिसतात."
- डॉ. द. भि. कुळकर्णी ('पार्थिवतेचे उदयास्त' मधून)
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books