Pasodi

See more images

Pasodi

पासोडी

Publisher
Papayrus Prakashan
Published
2020
Pages
220
ISBN
9788194395805
Language
Marathi

₹330

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मराठी मनातलं 'पासोडी' या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण, विलक्षण अशा चार शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. दीड दशकात लिहिलं गेलेलं वैविध्य असलेलं तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक 'पासोडी' असं आहे.


नीतीन रिंढे हे साहित्याचे आणि संस्कृतीचे व्यासंगी समीक्षक आहेत. ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथव्यवहार, ग्रंथेतिहास हे त्यांच्या निरंतर आस्थेचे विषय आहेत. प्रस्तुत संग्रहात ते ग्रंथांबद्दल, मराठी आणि परदेशी ग्रंथकारांबद्दल, वाड्मय संस्कृतीबद्दल आणि वाचन संस्कृतीबद्दल लिहितात. कारण हे त्यांचं साक्षेपी अक्षत्य आहे. त्याचबरोबर पुस्तकांची गावं, दुकानं आणि दुकानांचे अपमृत्यू, ग्रंथप्राप्तीच्या रम्यकथा यांविषयीही ते आत्मीयतेन लिहितात. त्यांची ही आत्मीयता प्रत्यक्ष आहे, साक्षात अनुभवातून आलेली आहे. हे लेखन रसपूर्ण आहे. अर्थात हे करीत असतांना ते वाड्मयीन संस्कृतीविषयीची निरीक्षणं नोंदवून थांबत नाहीत तर त्याची कठोरपणे चिकित्साही करतात.


वाड्मयव्यवहार, संस्कृतीव्यवहार आणि वाचनव्यवहार यांचा परस्परांशी अन्योन्य असा संबंध असतो आणि नीतीन रिंढे जेव्हा त्यातल्या एका व्यवहाराविषयी लिहितात, तेव्हा ते त्याचे इतर व्यवहारांशी असलेले संबंध दाखवत आपल्या सूत्राच्या चतुःसीमा विस्तृत करतात.


त्यांच्या आस्थेच्या या एक प्रकारच्या ग्रंथार्णवासाठी त्यांनी 'पासोडी' लिहिण्याला प्रारंभकेला आहे असं म्हणता येईल, कारण हा पट नैरंतर्याचं निदर्शक आहे आणि ते मराठी ग्रंथसंस्कृतीसाठी आणि अस्सल वाचनप्रेमींसाठी उपकारकही असणार आहे.


गणेश विसपुते

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

नीतीन रिंढे | Neeteen Rindhe

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.