About this book
रंगनाथ पठारे अनोखे कादंबरीकार आहेत. त्यांचा संवेदनधर्म आणि बौद्धिकता मराठीच्या इतर लेखकांप्रमाणे परंपरानिष्ठ व चाकोरीची नाही. विविध ज्ञानशाखांचे, शाखांचे आणि वाङ्मयप्रवाहांचे या लेखकाचे जबर वाचन ही तर सिद्ध गोष्ट आहे. त्यामुळेच पठारे यांची मराठी साहित्यपरंपरेतील मुद्रा फार ठसठशीत; शिवाय अलक्षित न करण्यासारखी आहे.
रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांतील दृष्टिकोन विविधांगी आहे. जीवनविषयक, स्त्रीविषयक, शैक्षणिक, विज्ञाननिष्ठ, ग्रामजीवनविषयक, तत्त्वज्ञानात्मक व इतर दृष्टिकोनांची मांडणी साधार व विस्तारपूर्वक संशोधकाने केली आहे. लेखकाच्या जीवनाचे नैतिक परिणाम / अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्यभावनेने खचितच महत्त्वाची मानायला हवी. बांधिलकी, जबाबदारी, कर्तव्ये, चिंतन आणि संबेदन हे घटक लेखक म्हणून फारच महत्त्वाचे असतात. नुसते लेखन फार उपयोगाचे ब कालंजयी असूच शकत नाही. एक मोठे भान आणि समर्थ भूमिका घेऊन पठारे लिहितात; यात काहीच शंका नाही. त्या दृष्टीने प्रा. पंडित रानमाळ यांनी या ग्रंथात घेतलेला कादंबऱ्यांतील दृष्टिकोनाचा बेध विचारार्ह नक्कीच आहे. रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीची भाषाशैली, उपहासशैली, बोलीभाषा, आत्मनिवेदनपरभाषा, प्रतीकात्मक, काव्यात्मक भाषा, भाषासंमिश्र भाषाशैली, तिरकस भाषाशैली, वृत्तपत्रीय भाषाशैली, म्हणी बाक्प्रचार यांचे चिकित्सक बिश्लेषण केले आहे.
रंगनाथ पठारे हे मानवी जीबन अस्तित्वाचा बेघ कादंबऱ्यांतून घेतात. बहुआयामी कादंबऱ्या लिहिणारा हा कादंबरीकार आहे. रंगनाथ पठारेंच्या सर्वच कादंबऱ्यांचे आशयसूत्र बर्तमानाचा वेध घेणारे आहे. रंगनाथ पठारे यांचे मराठी कादंबरीला आशयातील विविधता व कादंबरी रूपबंधातील नावीन्यपूर्ण बदल यांचे बहुमोल यागेदान म्हणता येईल, या ग्रंथात या सर्वांचा संक्षिप्त व मुद्देसूद वेध प्रा. पंडित रानमाळ यांनी घेतलेला आहे. ते स्वागतार्हच आहे.
डॉ. केशव सखाराम देशमुख
प्रसिद्ध कवी, समीक्षक व
माजी मराठी विभागप्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.