Vyakti Ani Valli

See more images

Vyakti Ani Valli

व्यक्ती आणि वल्ली

Publisher
Mouj Prakashan Gruh
Published
1962
Pages
202
ISBN
9788174868985
Language
Marathi

₹300

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

१९४३ साली 'अभिरुची'च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात 'हा कोण संप्रति नवा पुरुषावतार ?' अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं० वि० जोशी यांच्या-सारख्या मानकऱ्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.


ते कसब तेथेच न थबकता, पुढे अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले. एकेकसुद्धा भान हरवील असा; 'किमु यत्र समुच्चयम्' ? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा - आणि 'जन-साधारण' भारून जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की 'पु० ल०' म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही ! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाच !


देशपांड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तहऱ्हात धुंडाळल्या – आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य-स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही, माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्यावाइटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे कंगोरे निघतात ! आत कोठेतरी 'वल्ली' दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकी-खातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बऱ्यावाइटाचे अंतर्नाट्य देशपांड्यांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्याआमच्यांत आहे आणि लेखकातही !


अशा या वीस व्यक्ती आणि वल्ली !

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

पु . ल. देशपांडे | P. L. Deshpande

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.