मराठी साहित्य, पुस्तके आणि वाचनसंस्कृतीसाठी शब्दालय करत असलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान संपूर्ण शब्दालय परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.
Recognition of Shabdalay’s contribution to Marathi literature, books and reading culture marks a proud and inspiring moment for the entire Shabdalay family.
मराठी साहित्य, दर्जेदार पुस्तके आणि वाचनसंस्कृतीचा सातत्याने प्रसार करणाऱ्या शब्दालयसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. साहित्यिक कार्याची दखल घेत शब्दालयचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे शब्दालयच्या पुस्तकविषयक कार्याला, लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना आणि मराठी वाचकांपर्यंत उत्तम साहित्य पोहोचवण्याच्या ध्येयाला मिळालेली महत्त्वपूर्ण मान्यता आहे. या गौरवामागे शब्दालयशी जोडलेले लेखक, वाचक, साहित्यप्रेमी, सहकारी आणि हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे.
हा सन्मान शब्दालयच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून आगामी काळात अधिक दर्जेदार पुस्तके, लेखक-वाचक संवाद, साहित्यिक कार्यक्रम आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे नवे उपक्रम राबवण्याची प्रेरणा देणारा आहे. शब्दालयवरील प्रेम आणि विश्वासाबद्दल सर्व वाचक व साहित्यप्रेमींचे मनःपूर्वक आभार.
This recognition is a proud milestone for Shabdalay and its continuing commitment to Marathi literature, quality books and the promotion of a strong reading culture. Shabdalay was honoured with a commemorative award acknowledging its contribution to the literary community.
The honour recognises Shabdalay’s efforts to bring meaningful Marathi books to readers, support authors and create opportunities for literary engagement. This achievement has been made possible by the invaluable encouragement of our readers, authors, associates, well-wishers and literature lovers.
The award represents an important milestone in Shabdalay’s literary journey and inspires us to introduce more quality publications, author-reader interactions, literary programmes and reading-focused initiatives. We sincerely thank everyone who continues to place their trust in Shabdalay.