About this book
मुक्ता माय
ही कविता म्हणजे पुस्तकी शहाणपण मिळवलेल्या बाईनं पारंपरिक शहाणपणाला दिलेली दाद आहे. स्त्रीत्वाच्या कंगोऱ्यांसह स्त्रीनं समजून घेतलेली स्त्री, जी पुरुषाला कधीच समजली नसती; ती या कवितेत डॉ. वृषाली किन्हाळकरांनी मांडलेली दिसते. 'मुक्तामाय' हे डॉक्टरी भावविश्वाला सापडलेलं ग्रामीण पात्र आहे. वैद्यकीय भावविश्व कवितेत आणणाऱ्या या कवयित्रीने लिहिलेली ही दीर्घ कविता म्हणजे सर्व सुखं उपभोगलेल्या एका स्त्रीनं, एका सर्वत्यागी स्त्रीच्या स्त्रीत्वाचं केलेलं कौतुक आहे. ही कविता लिहून किन्हाळकरांनी मराठी कवितेत फार मोठं योगदान दिलेलं आहे असं मला वाटतं.
इंद्रजित भालेराव
'मुक्तामाय' या कवितेचा पीळ आणि पोत पुष्कळसा निराळा, खूपसा प्रेरक, अनेकदा अस्वस्थ करून टाकणारा आहे. जिवंत प्रतिभा म्हणून ह्या पूर्णतः अखंड रचनेचे मूल्य अधोरेखित करता येईल. आपल्याच शरीराचा एक तुकडा शोभावा किंवा आपल्याच काळजाला आलेले हे एक फूल म्हणावे, अशा प्रकारच्या गुंतवणुकीमधून डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी ही मुक्तामाय साकारली आहे. या संपूर्ण कवितेतून जाणवणारा आवेग वाचकांना हलवूनच सोडतो, ही या कवितेची बलवंत बाजू. या दीर्घ कवितेमधून किन्हाळकर एकाच वेळी प्रखर वास्तवतेला आत्यंतिक संवेदनशीलतेने समजून घेत शब्दबद्ध करतात आणि त्याच वेळी मुक्तामायीच्या पदरात बांधलेले एक प्रकारचे शोकतत्त्व विलक्षण हळूवारपणाने पाकळ्या उकलून दाखवाव्यात त्याप्रमाणे कवितेत मांडतात. स्वाभिमानसंपन्न ऊर्जेने भरलेले हे एक महत्त्वपूर्ण दीर्घकाव्य आहे.
डॉ. केशव सखाराम देशमुख
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.