Availability: In Stock

Aapli Harit Shala | आपली हरित शाळा

100.00

Isbn : 9788179934913

Publication Date : 02/03/2020

Pages : 19

Language : Marathi

Description

लक्षात असू द्या-

१. देश म्हणजे जमिनीचा असा भाग ज्यावर त्या त्या सरकारचे नियंत्रण असते.

२. गोड पदार्थ किंवा मिठाई मुख्य जेवणानंतरच खावी.

३. घातक कीटके आणि जंतू यांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी जंतूनाशकांचा वापर केला जातो.

४. इंजिनातून बाहेर पडणारा हानीकारक धूर व्यवस्थितपणे बाहेर काढला जावा.

५. मातीत मिसळलेली कीटकनाशके झाडांच्या वाढीसाठी मदत करतात.

६. अॅडम आणि इव्ह राहत असलेल्या अतिशय सुंदर ठिकाणास इटुन गार्डन असे म्हटले जाते असा बायबलमध्ये उल्लेख केलेला आहे.

७. लस्सी हा भारतीय पदार्थ दह्यापासून बनवला जातो.

८. प्राण्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पदार्थापासून चांगल्या प्रकारचे खत तयार होते. झाडाच्या उत्तम वाढीसाठी त्याचा उपयोग होतो.

९. वाहने, विमाने इ. पासून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते.

१०. प्राणवायू हा हवेमध्ये उपलब्ध असतो. आपल्या जगण्यासाठी तो आवश्यक आहे.

११. सौर यंत्रासाठी सूर्यकिरणांपासून मिळणारी उष्णता वापरली जाऊन त्यापासून वीज निर्मिती केली जाते.

१२. ठिबक सिंचनामुळे जमीन आणि झाडांना योग्य प्रकारे पाण्याचा पुरवठा केला जातो.

१३. अस्वच्छ पदार्थामुळे आजार उद्भवतात.