Availability: In Stock

Adhunik Bekari Vyavsay Tantradnyan | आधुनिक बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान

1,000.00

Isbn : 9788196318727

Publication Date : 10/03/2023

Pages : 398

Language : Marathi

Description

महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर माणसांची जीवन पद्धती आणि राहणीमानांत अमुलाग्र बदल होत आहेत. आजच्या धावपळीच्या जगात ‘रेडिमेड’ अन्न पदार्थांचा खप ही वाढत आहे. यामध्ये बेकरी पदार्थांचा वाटा सिंहाचा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात बेकरी उत्पादनांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे आणि बेकरी व्यवसायांत संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली आहे. महाराष्ट्र शासनाने बेकरी व्यवसायास लघुउद्योग म्हणून अनेक सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु या व्यवसायाच्या समस्याही अनेक आहेत. या समस्याची सखोल माहिती बेकरी व्यावसायिकांना व्हावी म्हणून या पुस्तकाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आधुनिक बेकरी तंत्रज्ञान ग्रामीण भागांत पोहचविण्याचे कार्य विद्यापीठाने हाती घेतले असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार निर्मितीस हातभार लावला आहे. विद्यापीठांत प्रशिक्षीत झालेल्या अनेक युवकांनी या व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या सर्व बाबींची माहिती गरजवंतापर्यंत पोहचवावी व या व्यवसायांतील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचे अनुभव सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य विद्यापीठामार्फत करता यावे यासाठी “आधुनिक बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान” या पुस्तकाचे काम केले आहे.