arrow_back Back to Books
अंतरीचे धावे
Marathi

अंतरीचे धावे

Antariche Dhave

person Bhanu Kale
₹200 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

ज्यांचा मराठी साहित्यसृष्टीशी थोडाफार परिचय आहे त्यांना आजकाल एखादे मराठी मासिक चालवणे हे किती जिकिरीचे काम बनले आहे, याची कल्पना असेलच. तशात तुम्ही मालक संपादक असलात तर ही ओढाताण अधिकच असते. पण तुमच्या आत कुठेतरी एखादा छोटामोठा लेखक दडलेला असेल, तर तो या धकाधकीतही आतून दुश्या देतच राहतो. आपल्या भोवतालच्या जीवनातील विसंगती आव्हाने आज कुठल्याही लेखकाला अस्वस्थ करतील अशीच आहेत. संपादकाची कामे करताना त्याच्यातल्या लेखकाची ही अस्वस्थता जास्तच छळत राहते कारण इतरांचे लेखन वाचता वाचता, त्यावर विचार-चर्चा करता करता स्वतः वे लेखन बाजूलाच पडते आहे, हे जाणवत असते. ही अंतरीची खळबळ मग वाहेर येण्यासाठी एखादे निमित्तच शोधत असते एखादे पुस्तक, एखादा प्रवास, एखादी भेटलेली व्यक्ती, किवा कधीकधी एखादे पूर्वनियोजित लेखन हाती न आल्यामुळे आयत्या वेळी निर्माण झालेली पाने भरण्याची गरज ते निमित्त साधून मग तो अंतरीचा द्वारा कुठेतरी पकट होतोच. अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी। याच प्रक्रियेतून गेल्या तेरा वर्षांत 'अंतर्नाद' साठी लिहून झालेल्या काही लेखांचा हा संग्रह. या लेखांमधून एक विशिष्ट जीवनदृष्टी व जीवनचिंतन वाचकांना कदाचित जाणवू शकेल. तसे झाले, तर या लेखनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. कारण कुठचेही चांगले साहित्य म्हणजे बहुतेकदा त्या लेखकाचा विशिष्ट असा 'अंतर्नाद'च असतो आणि तो वाचकांपर्यंत पोचवणे ही कुठल्याही लेखनामागची एक मुख्य प्रेरणा असते. 'बदलता भारत' प्रमाणे भानू काळे यांच्या याही पुस्तकाला चोखंदळ वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review