Availability: In Stock

Anukar | अनुकार

90.00

Publication Date : 17/06/2006

Pages : 80

Language : Marathi

Description

ही कविता जगण्यावर प्रेम करणारी आहे. तिच्यातला प्रेमावेग, खिन्नता, कोवळीक, तृप्ती या सगळ्याचं अनोखं रसायन आपल्याला हुरहुर लावणारं असं आहे. तिमिराच्या गुहेत लपती चंद्राचे किरण कवडसे घनदाट अरण्यामधुनी हुरहुरते काहुर बरसे या ‘दिवेलागणी’ या कवितेतल्या ओळी आपल्या मनातही काहूर माजवणाऱ्या आहेत.त्यांना माझ्या अंत:करणापासून शुभेच्छा.जयश्री राम पाठक यांची कविता समकालीन राजकीय, सामाजिक प्रश्नांपेक्षा आपल्या अंतर्मनातील भावनिक प्रश्नांमध्ये अधिक रमणारी आहे. किंबहुना तिथंच आपलं सार्थक ती शोधते. आपल्या पिंडधर्माशी प्रामाणिक राहून अपार सच्चा स्वर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयश्री पाठक यांचा छंदोमय उल्हास म्हणूनच मला फार स्वागतार्ह वाटतो.