Description
जन्म : १५ जून १९२४. राधानगरी (जि. कोल्हापूर). वडील कोल्हापूर संस्थानात वन अधिकारी. वर्षाचा असताना आईच्या माघारी ज्येष्ठ भगिनी म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचे एक भाग्यविधाते विष्णुपंत दामले यांच्याकडं वास्तव्य; म्हणून तेव्हापासून चित्रपटसृष्टीशी अप्रत्यक्ष संबंध.
प्राथमिक शिक्षण कोल्हापूर. पुढील इंटर सायन्सपर्यंत पुणे. १९४४ ‘प्रभात’च्या ‘रामशास्त्री’पासून प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीशी प्रत्यक्ष संबंध. ‘प्रभात’ शिवाय अन्य चित्रपट संस्थाच्या चित्रपटांना हीच जबाबदारी एकूण ७ चित्रपट. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या अनुबोधपटांचं दिग्दर्शन. १९५४ पासून वृत्तपत्रं, नियतकालिकं यात सातत्यानं लेखन. विशेषतः देशी विदेशी चित्रपटसृष्टी व कलावंत. तितकीच वर्ष आकाशवाणीशी संबंध. प्रथम कलाकार म्हणून; नंतर गेली ४२-४३ वर्ष लेखक. आतापर्यंत.
‘कथालक्ष्मी’ हे स्वतःचं कौटुंबिक मासिक २० वर्ष चालविलं. प्रेस्टीज प्रकाशनच्या ‘मयूरपंख’ या कलापाक्षिकाचा २ वर्ष संपादक.
चित्रपट, नाट्य नामवंत कलावंताच्या तसंच साहित्यिकांच्या जाहीर मुलाखती. १९६१ महाराष्ट्र राज्य सरकारच्या कथा स्पर्धात प्रथम पारितोषिक. बाईच्या विश्वकोशाच्या चित्रपट विभागाचा लेखक अभ्यागत संपादक. चित्रपटविषयक ठिकठिकाणी व्याख्यान पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठासह.
‘सतीची पुण्याई’, ‘धाकटी सून’ या रौप्य महोत्सवी चित्रपटांचा लेखक, निर्मितीप्रमुख. ‘एक होती प्रभातनगरी’ ग्रंथाला साहित्य परिषदेचा पुरस्कार, अन्य चार पुस्तकं. १९८६ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीबर ज्युरी म्हणून निवड







Reviews
There are no reviews yet.