Description
पावसाचे पाणी हे जगातील सर्वात शुद्ध पानी आहे आणि ते एक चकरिय स्त्रोत आहे ज्याचा आपण सतत पुनर्वापार करून विविध कारणांसाठी शुद्धीकरण करून उपयोग करू शकतो. तुम्हाला असे वाटत नाही का की पर्जन्यजल व्यवस्थापन ही लोकप्रिय सवय झाली पाहिजे ? प्राचीन भारत देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अतिशय अग्रेसर होता, आणि अगदी सुरुवातीच्या सिंधु खोरे संस्कृतीमध्ये देखील उत्कृष्ट परजांजल व्यवस्थापन पद्धती वापरात होत्या. पण जगाच्या विकासासोबत जाताना आपण या सवयींचा त्याग केला, आणि आता परत त्याच प्राचीन पद्धती नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापारात आणून पाणीटंचाई वर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत.
‘चला बचत करू पावसाची’ हे पुस्तक पर्जन्यजल व्यवस्थापनाच्या प्राचीन तसेस आधुनिक पद्धतींचीच चर्चा करत नाही तर या तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख देखील करून देते. ही कल्पना, तिचा वापर आणि निसर्गाशी संबंध यात छानपणे छोटे प्रयोग, स्वता करूया आणि गणिती आकडेमोड याच्या सहाय्याने समजावून दिली आहे. हे पुस्तक समजण्यास सोपे आहे आणि पर्जन्यजल व्यवस्थापना विषयी जागृती निर्माण करते.