Availability: In Stock

Covid 19-Akalpit Chakva | कोविड १९-अकल्पित चकवा

200.00

ISBN: 978819446114

Publication Date: 19/01/2021

Pages: 108

Language: Marathi

Description

‘कोविड १९’ हा या शतकातील कदाचित सर्वात जास्त उच्चारलेला शब्द असेल. या अत्यंत सुक्ष्म विषाणूने आपल्या संसर्ग क्षमतेने संपूर्ण जगाला अक्षरशः हरविले, बंदिस्त केले,जवळजवळ सात लाख लोक व हजारो कोरोना योध्यांचा बळी घेतला.अत्यंत शांतपणे व वेगाने पसरत जगाला ग्रासणारा ‘कोरोना’ २०२० या संपूर्ण वर्षभर थैमान घालत राहीला. अमेरिकेला गुडघे टेकायला लावून ‘कोरोना’ पसरवणारा चीन मात्र जगाला कोट्यावधी रुग्ण देवून स्वतः मात्र लाखभर रुग्णांत पुन्हा कामाला लागला. कुणी, कोठून कि षडयंत्र क चूक याचे उत्तर भविष्यात सापडेलच.मात्र अभिमान, अहंकार, गर्व यांना उतरवत आधुनिक जगाला आपल्या प्रगतीचे आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या कोरोनाने वर्षभर कोणते अकल्पित थैमान घातले, लाटेच्या रुपात येत जगाला कसे चकवले याचा भारत, महाराष्ट्र व जगावर कोणता दुरगामी परिणाम झाला. भारत, अत्यंत संयमाने, धीराने व दुरदर्शीपणे प्रयत्नांची, शिस्तीची पराकाष्ठा करत पहिल्या लाटेतून बाहेर पडत, लशीचे स्वप्न साकारा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करु लागला.याचा सारासार दृष्टीकोनातून विचार करत कोरोना २०२० ला शब्दबध्द करणे एवढाच या पुस्तकाचा हेतू आहे!