Description

एक होती वाघीण

वि.वा. शिरवाडकर

लेखकाने ‘एक होती राणी’ या नावाने लिहिलेले नाटक रंगभूमीवर आले ते ‘एक होती वाघीण’ या नावाने. मूळ लेखनानंतर बऱ्याच काळानंतर हे प्रेक्षक-वाचकांसमोर आले. तोवर बरेच संदर्भ बदलले होते.

या नाटकाचा एकाधिकारशाही विरुद्ध जनशक्ती हा सदंर्भ महत्त्वाचा आहेच. तरी तोच एक ह्या नाटकाचा केंद्रबिंदू नव्हे. कला आणि प्रीती यांचे प्रत्येक व्यक्तीच्याच नव्हे तर समाजजीवनातील महत्त्व लेखकाने मनोरंजकरीत्या मांडले आहे.

ह्या नाटकाची कथावस्तू शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली आहे हा या नाटकाचा एक विशेष. या नाटकात समूहगीत आणि गणगीत यांच्या रूपाने संगीताचा फार वेगळ्या प्रकारे उपयोग केला आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाने केलेल्या निर्मितीत संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी केलेल्या प्रयोगाची हकीकत त्यांनी ह्या ‘शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष’ आवृत्तीत लिहिली आहे. पहिल्या प्रयोगातील सुनीला प्रधान, अशोक पत्की, रजनी आणि प्रदीप वेलणकर यांच्या आठवणीही दिलेल्या आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ek Hoti Waghin | एक होती वाघीण”

Your email address will not be published. Required fields are marked *