Description

जागतिकीकरण झाल्यानंतरच्या जगात वाढलेली पिढी तपशिलांकडे स्वच्छपणे बघते. मनस्विनी या पिढीची. भोवतालाकडे थेटपणाने आणि स्वतःच्या सुस्पष्ट जाणिवांमधून बघत ती या कथासंग्रहात समकालीन वास्तवाचा लेखाजोखा मांडते आहे. तिच्या कथा प्रश्नाच्या व्यापक आणि सूक्ष्म तपशीलांच्या मांडणीतून व्यक्त होतात. त्यात लिंगभाव केंद्रस्थानी असला तरी जागतिकीकरणाच्या तुफानात विस्कटलेल्या परिसरात तो व्यामिश्र होत जातो.

‘पायरी एकच तरी शर्यत, एका फुटावरुन उड्या, परत चढा परत मारा परत चढा परत मारा परत चढा परत मारा…’ ‘किती कट रचत चाललीत माणसं इथे. ते पण व्हाईट बोर्डवर. माणसं प्रचंड काम केल्यासारखी लोकांना त्रास द्यायचे फंडे शोधत जायायत. त्यांचं नीट अॅनालिसिस होतंय. त्यांच्यावर नजर ठेवली जातेय.’

अशा अधिवासात वाढलेल्या स्त्री-पुरुष नात्यासमोरची आव्हाने बिकट होत आहेत. शरीर वेठीला धरणाऱ्या महानगरात थकणाऱ्या शरीराने मन सांभाळणे अवघड जाते आहे पण तरीही लिंगभावाचे सम्यक भान या कथा समोर आणतात. ‘दुसऱ्याला शिक्षा द्यायचा अधिकार एकानं जेव्हा ताब्यात घेतला तिथून संस्कृतीची सुरुवात झाली.’ ही त्यातील तळातली जाणीव आहे.

त्यातूनच मग प्रस्थापिताला नाकारण्याची धडपड करणाऱ्या स्त्रियांच्या कथा येतात. जेव्हा हे जमत नाही तेव्हा मग पुरुषसत्तेशी क्वचित हातमिळवणी केली जाते. ‘मला ट्रिक कळलीय लग्नाची. नवऱ्याला स्वतःवरच अवलंबून राहायला भाग पाडायचं. आपण त्याच्या आईची जागा घ्यायची हळूहळू. मग कधीतरी म्हातारपणी त्याची ताकद कमी होणारच, मग घ्यायचा बदला.’

अशी म्हटलं तर व्यक्तिगत म्हटलं तर राजकीय नीतीत रुतलेली नाती नाकारण्याची असोशी मनस्विनीच्या कथांमधून जाणवते.

गमावत चाललेल्या माणूसपणाला कानांत सांभाळणारे हे झुमके !

वंदना भागवत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Halate Dulate Zumake | हलते डुलते झुमके”

Your email address will not be published. Required fields are marked *