Description
१९४० ते ५० हे दशक हा भारताच्या इतिहासात कम्युनिस्ट पार्टीच्या दृष्टीनेच नव्हे तर समग्र राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व खळबळजनक घटनांनी भरलेला कालखंड होता.
या काळात शेकडो नव्हे तर हजारो कार्यकर्ते कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे निष्ठावंत पाईक बनलेले होते आणि त्यांच्या साहाय्याने पार्टीचे पुढारी आपल्या परीने त्या काळातील ऐतिहासिक घटनांना वळण देण्याचा प्रयत्न करीत होते. दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वतःला क्रांतिकारक म्हणविणाऱ्या या पार्टीन या कालखंडात काही भयानक अशा चुका केल्या आणि त्याचे परिणामही तितकेच भयावह झाले.
१९४०च्या दशकात लहानसा का होईना पण क्रांतीच्या आशेचा किरण म्हणून असलेली ही पार्टी त्या दशकाच्या अखेरीस आकाराने व संख्येने वाढली पण शेवटी छिन्त्रविच्छिन्न होऊन गेली. साहजिकच त्या कालखंडात पार्टीमध्ये असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या जीवनावर तर मोठा परिणाम झालाच, परंतु त्याचबरोबर राष्ट्राच्या जीवनातील एक मोठी शक्ती म्हणून वर येऊ लागलेल्या कम्युनिस्ट व डाव्या विचारसरणीच्या प्रभावालाही फार मोठा हादरा बसला.








Reviews
There are no reviews yet.