Availability: In Stock

Hurduk | हुर्दुक

90.00

Publication Date – 01/04/2004

Pages – 80

Language – Marathi

Description

माझी स्वतःपुरती कवितेची व्याख्या अशी आहे..

कविता म्हणजे काय ?

रक्तावर आलेली विस्तवाची साय.

वर्डस्वर्थ या आंग्ल कवीची जगमान्य व्याख्या आहे ‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility’ ‘उत्कट भावनांचा उत्स्फूत उद्रेक म्हणजे कविता’. हे खरेच आहे. परंतु यापुढे कवितेची व्याख्या जात नाही.

वर्डस्वर्थच्या एक शतक आधी आपल्या तुकोबांनी कवितेची व्याख्या केली आहे. ‘अंतरीचे धावे । स्वभावे बाहेरी’. वर्डस्वर्थच्या व्याख्येतील आशय तुकोबांनी एक शतक आधीच सांगून ठेवला आहे. पाश्चात्यांच्या कौतुकाची व अनुसरणाची आपल्याला भारी सवय असल्यामुळे तुकोबांच्या या देशी व्याख्येकडे आपण दुर्लक्ष करतो. ‘अंतरीचे धावे । स्वभावे बाहेरी’ यापुढे ‘येणे सुखे रुचे। एकांताचा वास’ आणखी पुढे ‘तुका म्हणे होय । मनासी संवाद’ ह्या अभंग-ओळी एकत्र ठेवल्या की वर्डस्वर्थची व्याख्या तयार होते. अंतरीचे स्वाभाविकपणे बाहेर धाव घेणे हे केव्हा शक्य होते, तर ‘तुका म्हणे झरा। आहे मुळीचाच खरा.’ म्हणजे तुमचा अनुभव सच्चा असेल तर अभिव्यक्तीही सच्चेपणानेच होत असते. झरा म्हणजे अस्सल अनुभवाचे अक्षय संचित, हेच तुकोबांना सांगायचे आहे. तुकोबांची कवितेची ही व्याख्या म्हणूनच मी अंतीम मानतो

Additional information

Book Author