Description
आजच्या गुंतागुंतीच्या, सतत बदलणाऱ्या जगात अनेकदा रस्ता हरवल्यासारखे वाटू लागते. मग ती करियर असो, व्यक्तिगत नाती असोत, मैत्री असोत, अगदी अध्यात्मिक प्रगतीमधील शंका असोत.
‘गुरुवीण कोण दाखवील वाट’ या कबीरदासजींच्या भजनातले महत्वाचे शब्द होते ‘कोण दाखवील वाट?’ श्रीनिवास बेलसरे यांचे हे पुस्तक त्याच शोधाचा मागोवा आहे.
हे पुस्तक अनेक बाबतीत, जगभरच्या नव्या जुन्या विचारवंतांचे चिंतन समोर ठेवून कुणालाही, कोणत्याही बाबतीत वाट दाखवणारे ठरेलं अशी मला खात्री आहे.