Description

कविता, विशेषतः आधुनिक कविता, हे डॉ० वसंत पाटणकर यांच्या आजवरच्या समीक्षालेखनाचे आस्थाकेंद्र राहिले आहे.

कवितेच्या बिलोरी अस्तित्वाचे विविध विभ्रम तरल संवेदनक्षमतेने न्याहाळावेत आणि काटेकोर सांकल्पनिक शिस्तीने तिच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण करत जावे, हा उपक्रम त्यांच्या कविताविचाराच्या गाभ्याशी सतत राहिला आहे. ‘कवितेचा शोध’ ही याच उपक्रमाची परिणत अवस्था आहे.

कवितेची एकसत्त्ववादी संकल्पना खोडत तिच्या विविध उपप्रकारांना आपल्या विचारव्यूहात स्थान देत केलेली कवितेविषयीची समग्रतालक्ष्यी मांडणी हा डॉ० वसंत पाटणकर यांच्या येथील विवेचनाचा महत्त्वाचा विशेष आहे. आत्मपरता आणि अनात्मपरता या भेदाला अग्रक्रम देत कविता या साहित्यप्रकाराची एक नवी व्यवस्था डॉ० पाटणकरांनी लावली आहे.

कवितेच्या अनेकांगी अस्तित्वाला दिशा देणाऱ्या लयबद्धता, सांगीतिकता, अनेकार्यक्षमता, दुर्बोधता, प्रयोगशीलता, वैचारिकता अशा अनेक विशेषांची चर्चा करत कवितेचे साहित्यशास्त्र डॉ० पाटणकरांनी सिद्ध केले आहे. ही मांडणी करताना कविते-विषयीचा मराठीतील विचार, संस्कृत साहित्यशास्त्र आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्र यांचा समर्पक आधार डॉ० पाटणकरांनी घेतला आहे.

‘कवितेचा शोध’मधील कवितेचे आकलन हे या साहित्यप्रकाराच्या सैद्धान्तिक चर्चेला नवे वळण देणारे, नवे परिमाण प्राप्त करून देणारे आहे. कवितेविषयीची जाणीव समृद्ध करणारे प्रगल्भ आणि मूलभूत चिंतन त्यातून प्रकट होते.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kavitecha Shodh | कवितेचा शोध”

Your email address will not be published. Required fields are marked *