Description
प्रस्तुत कवितांच्या संग्रहामध्ये नव्वदोत्तर कालखंडातील निवडक पंचवीस कवींच्या कवितांची केलेली निवड ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. सदर लेख हा या कवितांपर्यंत विद्याथ्यांनी सुकरतेने पोहोचण्यासाठी केलेला एक दिशादर्शक प्रयत्न आहे. विद्यार्थी जेव्हा ह्या कविता वाचायला घेतील. समजून घेण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना हा लेख उपयुक्त ठरेल. प्रस्तुत काव्यरंगमध्ये समाविष्ट असलेल्या कवींनी आपल्या कवितांचा समावेश ह्या संग्रहात होक दिला, त्यासाठी त्यांचे व त्यांच्या सर्व प्रकाशकांचे मनःपूर्वक आभार. मला काव्यरंगची प्रस्तावना लिहिण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक वंदना महाजन यांनी व अन्य सदस्यांनी दिली, याकरिता त्यांचा मी ऋणी आहे. शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे ह्या पुस्तकांशी संबंधित सर्व उपक्रमात आस्थेने सामील होतात. सदर पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचा हातभार मोठा आहे. त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद.