Description

जयंत पवार हे मराठी कथेला मुक्ततेचा आशय देऊन अधिक खुलेपण देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. आधुनिक मराठी कथाबदलाचा हा वळणटप्पा आहे. कथा या प्रकाराच्या अनेक शक्यतामिती निर्माण करून त्यांनी मराठी कथेला नवी परिमाणे प्राप्त करून दिली आहेत. ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी ‘मधून त्यांनी लघुकथा आणि कथा यांच्या सीमारेषा धूसर करणारा नवाच रूपबंध घडवला आहे. या लेखनातील कथनसहजता गोष्टीच्या जवळ जाते. अभावग्रस्त मानवी जगण्याच्या लेखकीय संवेदनशीलतेतून या कथांचे आशयद्रव्य आकारले आहे. संदिग्ध आणि सापेक्ष वास्तवाच्या अर्थनिर्णयाच्या दिशा भूत आणि भविष्याने निर्धारित कल्पिताने उजागर केल्या आहेत. व्यवस्थेचा उपहास आणि सामान्यांच्या यातनापूर्ण हतबलतेला एकाच वेळी कवेत घेण्याची विलक्षण कलात्मकता त्यांना साधली आहे. तळातल्या माणसाच्या भावजीवनाचे तळकोपरे धुंडाळत पशू-पक्षी, एकूणच जीवसृष्टीच्या संदर्भात मानवी जीवनाचा विचार होऊ शकतो, तोच मानवी अस्तित्वाचा आधार आहे. या जाणिवेमुळे ह्या कथा जगभरातल्या मानवजातीच्या होऊन जातात.

जयंत पवार यांनी लिखित कथेला गोष्टीच्या जवळ आणून तिला खऱ्या अर्थाने तिचं हरवलेलं भारतीयत्व बहाल केलं आहे.

– दत्ता घोलप

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lekhakacha Mrityu Aani Itar Goshti | लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *