Availability: In Stock

Mardhekaranchi Kavita Swaroop Ani Sandarbh Khand Dusara | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ खंड दुसरा

200.00

ISBN – 9788174867513

Publication Date – 24/12/1991

Pages – 278

Language – Marathi

1 in stock

Description

बाळ सीताराम मर्डेकर हे आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी होत. त्यांच्या कवितेमध्ये, भिन्न भिन्न पिढ्यांच्या व काव्यविषयक भूमिकांच्या समीक्षकांना समाधान व आव्हान-दोन्ही देण्याचे सामर्थ्य आहे.

मर्देकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ हा डॉ० विजया राजाध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्देकरांच्या कवितेचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय.

मर्देकरांच्या कवितेच्या अंतरंगातील आशयाचा व त्याच्या आविष्काराच्या रूपाचा निखळ शोध पहिल्या खंडात घेतल्यानंतर या दुसऱ्या खंडात, मर्देकरांचे चरित्र व व्यक्तिमत्त्व, तसेच त्यांची काव्येतर ललितनिर्मिती व समीक्षालेखन आणि त्यांच्या कवितेमागे उभ्या असलेल्या देशी व विदेशी काव्यपरंपरा या तीन संदर्भात मर्देकरांच्या कवितेचा विचार केला आहे. अभ्यासाची ही दिशा अस्पर्शित, नव्या स्वरूपाची आहे.

मर्देकरांशी अखंड, निरंतर असे नाते जडलेल्या डॉ० विजया राजाध्यक्ष यांची जातिवंत रसिकता व गाढ व्यासंग यांचा आणि आस्वादक व विश्लेषक समीक्षादृष्टी यांचा विरळा संयोग येथे पाहायला मिळतो. रसिकाची संवेदनाशक्ती समृद्ध करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती होय.

– प्रा० मीना गोखले

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mardhekaranchi Kavita Swaroop Ani Sandarbh Khand Dusara | मर्ढेकरांची कविता स्वरूप आणि संदर्भ खंड दुसरा”

Your email address will not be published. Required fields are marked *