Description
बाळ सीताराम मंर्डेकर हे आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी होत त्यांच्या कवितेमध्ये, भित्र भित्र पिढ्यांच्या व काव्यविषयक भूमिकांच्या समीक्षकांना समाधान व आव्हान-दोन्ही देण्याचे सामर्थ्य आहे.
मर्देकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ हा डॉ० विजया राजाध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्देकरांच्या कवितेचा सशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय.
या पहिल्या खंडात, सुरुवातीला मर्डेकरांच्या कवितेवरील समीक्षेचे संक्षिप्त समालोचन व एकूण नवकाव्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मर्देकरांच्या कवितेतील आशयसूत्रे आणि मर्देकरांची काव्यशैली व प्रतिमासृष्टी यांच्या विवेचनातून मर्देकरांच्या कवितेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. तसेच मर्देकरांच्या कवितेवरील आक्षेप, तिचा समकालीन व पुढील कवीवर पडलेला प्रभाव, मर्देकरांची परंपरा आणि मर्डेकरांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादा यांचाही सखोल विचार मांडलेला आहे.
डॉ० विजया राजाध्यक्ष यांची जातिवंत रसिकता व गाढ व्यासंग यांचा आणि आस्वादक व विश्लेषक समीक्षादृष्टी यांचा विरळा संयोग असणाऱ्या, या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती होय.
– प्रा० मीना गोखले







Reviews
There are no reviews yet.