Description
गुंफा कोकाटे यांचा ‘रानभरारी’ हा पहिला कवितासंग्रह. त्यांची कविता वाचताना एका निर्भिड व्यक्तित्वाचा रसिकांशी संवाद होतो, असा अनुभव येतो. छत्रपती शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारांचा प्रभाव या कवयित्रीला विचारप्रवृत्त करतो. स्त्री जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या कवितेतील स्त्रिया अतिशय स्वाभिमानी आहेत. निश्चित भूमिका घेणाऱ्या आहेत. अन्याय, अत्याचाराला ठाम विरोध करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व सावित्रीचा निर्भिडपण त्यांच्या कवितेत व्यक्त झाला आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास व काव्य लेखनास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औ.बाद.