Description

‘संथ थंड संगाशी संग’ हा सुधीर राजाराम देवरे यांचा सहावा कवितासंग्रह. त्यांचा संपूर्ण काव्य प्रवास ‘माझ्या आत्मनिष्ठ जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ आविष्कार!’ या शब्दांत ते मांडत आले आणि त्यांच्या कविता वाचून ते बहुतांशपणे खरे आहे. तरीही ह्या संग्रहातल्या कवितांत त्यांनी ठरवून भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांची ही भूमिका मानव धर्माची पाठराखण करणारी असून आगळ्या वेगळ्या संवेदनशीलतेने चित्रमय दृश्यात ती आविष्कृत होते.

समकालीन उलथापालथीच्या काळात विचारी माणसाची वाढत जाणारी अस्वस्थता, सामाजिक, राजकीय चिंतन, मानवीय समष्टी समस्यांतून भूमिकांची उत्स्फुर्तता, अभिव्यक्तीतील सार्वजनिकपण, संपूर्णत्व की अपूर्णत्व, सामाजिक बांधिलकीतील असणे-नसणे, सत्तेची नशा, देश, देव, धर्म, व्यवस्था, प्रांत, भाषा यातून कवीचे आत्मचरित्र घडत जाते की बिघडत जाते. अशा सर्वांगिण भूमिका घेत व्यवस्थेच्या भोवाड्यात नेमके कोणते सोंग कसे वठवावे- नाचवावे, हा प्रश्न संग्रहभर अगम्य संगीतात आत्मनिष्ठतेतून समष्टीत निनादत राहतो. सुधीर देवरे यांच्या कविता वाचकाच्या मनन-चिंतनाचा विषय होत कालातीत महाकाव्यासारख्या सलगपणे सर्वदूर कायम वाचल्या जातील !

– शरणकुमार लिंबाळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Santh Thand Sangashi Sang | संथ थंड संगाशी संग”

Your email address will not be published. Required fields are marked *