Availability: In Stock

Shabdalaya Diwali Ank – 2024 | शब्दालय दिवाळी अंक – २०२४

Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

Publication Date :- 2024

Pages :- 166

Language :- Marathi

Description

संपादकीय…

प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार.
वेगवेगळ्या विषयांवरील लेख- कथा- कवितांनी सजलेला हा अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

हे संपादकीय लिहीत असतानाच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची बातमी आली. जगातील प्रमुख बारा भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. मराठी बोलणाऱ्याची संख्या कोटिमध्ये आहे. ‘अभिजात’चा शिक्का सरकार दरबारी मिळाल्याने मराठी ही उच्च शिक्षणाची भाषा होऊ शकते; ज्याची तातडीने गरज आहे, असे तज्ञांचे मत आहे. उच्च शिक्षण मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल, परिणामी मराठी भाषेचा विकास होईल अशी आशा वाटते.

कधीकाळी भारत ‘तरुणांचा देश’ म्हणून ओळखला जात होता. आता कंटेंट क्रिएटर्सचा देश म्हणून ओळखला जातो की काय अशी शंका येते. प्रत्येकाच्या हातात फोन आणि इंटरनेट आहे. कोणत्याही गोष्टीचे, कृतीचे, कंटेंट होत आहे आणि ते इंटरनेटवरून सगळीकडे पसरवले जात आहे. आपण काय आणि किती कंटेंट बघतो आहोत यालाही काहीही धरबंध उरलेला नाही. अर्थात याची चांगली बाजू सुद्धा आहेच. जिथे मीडिया अपुरा पडतोय, तिथे काही कंटेट क्रिएटर्स सत्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सगळं जग आपल्याला हातातील वीतभर स्क्रीनवर एकवटलं आहे, परंतु हातातील पुस्तक दिसेनासं होत आहे. मराठी भाषा ‘अभिजात’ होण्याच्या निमित्ताने का असेना, या उत्साहात मराठी, मराठी वाचनसंस्कृती आणि ग्रंथ व्यवहारास चांगले दिवस आले, तर आपण योग्यच दिशेने जात आहोत, असे म्हणता येईल. मुलांना इतर गरजेच्या गोष्टी घेऊन देतो त्याचप्रमाणे पुस्तकंही घेऊन देऊया, एकमेकांना पुस्तकं भेट देऊया आणि स्वतः स्वतःसाठी नवीन पुस्तकं विकत घेऊया. येणाऱ्या नवीन वर्षात वाचनसंस्कृती वाढीस लागून जगाचा प्रवास सुसंस्कृतपणाकडे होईल अशी आशा करूया.

या अंकाच्या निर्मितीत सहभागी असलेले सर्व घटक, लेखक, कवी, चित्रकार, अक्षरजुळणीकार, मुद्रीतशोधक, मुद्रक आणि शब्दालय परिवारातील सर्व सदस्य यांचे मनापासून आभार.

शब्दालयचे सर्व वाचक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि निर्मितीत सहभागी असलेल्या सर्व घटकांना दिवाळी आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.