Description
मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील ‘शाहिरी वाङ्मय’ हा अत्यंत महत्त्वाचा वाङ्मयीन प्रवाह आहे. या प्रवाहामधून मराठी साहित्यात अगदी पहिल्यांदा लौकिक जीवनाचा आविष्कार झाला, मराठी संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडले. लावणी, पोवाडा, तमाशा हे शाहिरी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत. प्रा. विश्वनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात शाहिरी वाङ्मयातील वेगवेगळ्या घटकांचे मूलगामी विवेचन केले आहे. त्यांच्या लेखनाला क्षेत्रिय अभ्यासाचा भक्कम आधार असल्याने या वाङ्मय प्रवाहातील अनेक अज्ञात गोष्टींवर नवा प्रकाश पडलेला आहे. या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये आणखी दोन लेखांची भर घातलेली असल्याने अभ्यासकांना या ग्रंथाची उपयुक्तता अधिकच जाणवेल यात शंका नाही.