Availability: In Stock

Shalom | शालोम

Original price was: ₹480.00.Current price is: ₹400.00.

ISBN: 9788197423765

Publication Date: 01/07/2024

Pages: 274

Language: Marathi

Description

कथनतंत्र, आशयाची सघनता आणि विषय वैविध्य या तिन्ही अंगांनी पंकज कुरुलकर यांच्या कथा विचार करायला लावतात. मानवी मनाचा ठाव घेणारी आणि त्याची उकल करणारी त्यांची कथा आधुनिक जगण्यातल्या नव्या रूपाबरोबर त्यातली गुंतागुंत अधोरेखित करते. धर्म, तत्त्वनिष्ठा, नैसर्गिक व्यंग, वाट्याला आलेले भोग, उच्चभ्रू जगण्याच्या वाटांवरील काटेरी वास्तव आणि जगण्यातले बदललेले संदर्भ यातील असंख्य पदर उलगडताना मानसिक पातळीवर होणारी भावव्याकुळ स्पंदने सहजतेने आविष्कृत करणारी त्यांची कथनशैली वाचकाला खूप खोलवर खेचत नेते. सामान्य माणसांच्या मनातील खळबळ आणि जगण्याचे तीव्रतर भान यांचा मेळ घालणाऱ्या त्यांच्या कथेत जीवनमूल्यांची होणारी पडझड आणि ती टिकवण्यासाठी दिली जाणारी झुंज यांचे द्वंद्व उभे राहते. माणसांच्या गोष्टी सांगता सांगता पंकज कुरुलकर यांची कथा जीवनमूल्यांची फेरमांडणी करण्याचे सूचनही करते.

नातेसंबंधांची जीवघेणी उलघाल व असोशी यांच्या चढउतारातून उभे राहणारे माणसांच्या स्वभावाचे असंख्य पैलू या कथेतून आकाराला येतात. ही कथा अस्वस्थ करते, विचार प्रवृत्त करते, नवे काही सांगू पाहते आणि वाचकांचे तळमन ढवळून काढते. भिन्न दृष्टिकोनांचा अपूर्व मेळ घालणारे पंकज कुरुलकर यांचे कथालेखन मराठी कथासृष्टीला एका उंचीवर नेऊन ठेवणारे आहे हे सांगण्याची आवश्यकता उरत नाही, हे निश्चितपणे म्हणता येते.

  • डॉ. सतीश बडवे

Additional information

Book Author