Description
नगरच्या जिल्हा न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून त्यांचाच गाऊन घालून, रात्रीच्या वेळी, कंदिलाच्या प्रकाशात पाहिजे का कुणाला न्याय?’ हा प्रश्न रिकाम्या कोर्टाला विचारणाऱ्या, साकूरसारख्या आडवळणी खेड्यातील दिनकर (बापू) शेलार यांचे हे आत्मकथन, निरागस बालीश बापूकडून अजाणतेपणे घडलेले हे साहस त्याच्या आयुष्यातील स्वप्न बनले. नियतीच्या प्रवाहात बापू पुढे संगमनेरमध्ये वकील व सर्वांचा शेलारमामा होतो. यशस्वी वकीली सोडून उरी बाळगलेल्या स्वप्नपूर्तीकरीता न्यायाधीश बनतो. त्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. सर्वांगीण जीवनाचे परिपूर्ण आयुष्य व्यतीत करताना तो सामाजिक बांधिलकी कधीही सोडीत नाही. निगर्वी, मनमिळाऊ व सरळ स्वभावाच्या, थोडक्यात बिना काना, मात्रा व वेलांटी अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या दिनकर शेलार यांच्या ओघवत्या, काहिशा मिष्किल पण तटस्थ अशा न्यायाधीशाच्या लेखणीतील हे ‘सुंबरान’ आपणास एका वेगळ्या मोरपंखी स्पर्शाचा आल्हाद करून देईल.