Description
उत्सुकतेने मी झोपलो
श्याम मनोहर
‘कुटुंबात विचारच होत नाहीत.’
‘कशाला विचार हवेत ? कुटुंब म्हणजे सुरक्षितता, कुटुंब म्हणजे सुख…’
‘कुटुंबात माणूसच समजत नाही.’
‘कशाला माणूस समजायला हवा? कुटुंब म्हणजे प्रेम करायचं, प्रेम घ्यायचं…’
तीन विभागांत सलग आशयसूत्रे गोबणारी ही कादंबरी म्हणजे सर्जनाच्या अविरत ऊर्जेतून निर्माण झालेला एक प्रयोग आहे. श्याम मनोहरांनी या कादंबरीत मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्थेचे जणू सूक्ष्मदर्शक यंत्रातून निरीक्षण केले आहे. कुटुंबव्यवस्थेचे अवमूल्यन न करता, तिच्या मर्यादा आणि संबेदनक्षम ज्ञानाची आस असलेल्या माणसांची, या व्यवस्थेत जगतानाची तगमग त्यांनी अत्यंत तरलपणे व्यक्त केली आहे. कुटुंबव्यवस्थेचे, पर्यायाने समकालीन समाजाचे बारकाव्यांनिशी तपशीलवार, अंतच्छेदन करीत जात, त्यातील सूक्ष्म सांस्कृतिक राजकारण; ज्ञान, कला, अस्सल आध्यात्मिक आच आणि कल्पकता यांचा अभाव ते उलगडीत जातात. भरपूर पात्रे, प्रसंग असूनही कथानकाची चौकट टाळणारे कथन आणि केवळ श्याम मनोहरांचीच असणारी, आत्मीयतेचे मृदू पोत असलेली; तरीही अंतः स्तरावरल्या गर्भित चिकित्सेने वाचकाला कुंठित करणारी शैली ही त्यांच्या सर्वच लेखनाची वैशिष्ट्ये या कादंबरीतही जाणवतात.
– प्रभा गणोरकर






Reviews
There are no reviews yet.