arrow_back Back to Books
विनोद : तत्त्व आणि स्वरूप
Marathi

विनोद : तत्त्व आणि स्वरूप

Vinod : Tatva Ani Swaroop

person G. M. Pawar
₹250 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

डॉ० गो० मा० पवार यांचा विनोद तत्त्व आणि स्वरूप हा ग्रंथ विनोदाची सैद्धान्तिक पातळी-वरून व्यापक, सखोल व साधार चर्चा करणारा मराठीमधील पहिलाच मौलिक स्वरूपाचा ग्रंथ आहे, असे म्हणणे यथार्थ ठरेल. डॉ० पवार यांनी प्लेटो, अॅरिस्टॉटल, भरतमुनीपासून तो बर्गसाँ, फ्रॉइड, कोसलर इत्यादी पाश्चात्त्य आणि पौर्वात्य, प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सौदर्यशास्त्रज्ञ व विचारवंत यांनी मांडलेल्या उपपत्तींचे विश्लेषण करून, त्यांमधील ग्राह्य-अग्राहा भाग तर्कशुद्ध रीतीने दाखविला आहे. सुखात्म जाणीव हा आशय व वेगवेगळ्या पातळ्यांवरील विभिन्न आकलनांचा आकस्मिक परस्पराघात हे अभिव्यक्तिवैशिष्ट्य, अशा दोन्ही वैशिष्ट्यांची एकाच वेळी प्रतीती देण्यातून विनोदात्मता या धर्माची म्हणजेच विनोदाची निर्मिती होते, अशी विनोदाची नवी संकल्पना डॉ० पवारांनी मांडली आहे. सुखात्म स्वरूपाचा आशय कोणत्या प्रकारे आविष्कृत होतो यावरून विनोदाची उपहास, कोटी व केवल विनोद ही तीन मूलभूत विनोदरूपे कशी निष्पन्न होतात आणि ती कोणत्या प्रकारे प्रकट होतात; तसेच उपरोध, विडंबन, ब्लॅक ह्यूमर हे विनोदप्रकार कसे नव्हेत याची सर्वस्वी नवीन वाटावी अशी चिकित्सा डॉ० पवारांनी केली आहे. विनोद आणि सामाजिकता यांचे नाते, विनोदाचे कलामूल्य, विनोद हा वाङ्मयप्रकार की वाङ्मयविभाग, अशा विनोद‌विषयक काही प्रश्नांचा ऊहापोह करून त्यांनी आपली भूमिका सुस्पष्टपणे मांडली आहे. डॉ० पवारांनी पाश्चात्त्य विचारवंतांच्या भूमिका यथातथ्य स्वरूपात मांडल्या आहेत. त्यांचे विश्लेषण तर्कशुद्धपणे केले आहे. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष जीवनातून तसेच इंग्रजी-मराठी साहित्यातून आवश्यक तेवढीच मार्मिक उदाहरणे घेतली आहेत. वादग्रस्त, गुंतागुंतीच्या विषयाचेही विवेचन अत्यंत सुबोधपणे, सुस्पष्ट स्वरूपात केले आहे. विचाराचा स्वतंत्रपणा, वस्तुनिष्ठ दृष्टिकोण व वेधक, तर्कशुद्ध साक्षेपी मांडणी, इत्यादी गुणवैशिष्ट्यांमुळे हा ग्रंथ विनोदविषयक सैद्धान्तिक स्वरूपाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावल्यावाचून राहणार नाही.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review