Availability: In Stock

Yeru Mhane | येरु म्हणे

100.00

ISBN: 9789380617763

Publication Date: 01/06/2020

Pages: 71

Language: Marathi

Description

प्रवीण बांदेकर यांची ही कविता एका कविच्या आंतरिक कल्लोळाच्या वर्तमानाची कविता आहे. तिचे नाते कणाकणाने प्रवाहित होत, शतकांमधून पाझरत आपल्यापर्यंत आलेल्या तुकोबाच्या कवितेशी आहे. आयुष्य जगताना आरंभीची कोवळीक मिटत जाऊन निबर होत जाणे असा संस्कार उरतो हे खरे असले तरी कोवळीकीचे भान संपत नाही, वाहणे; वाहण्याची कांक्षा करणे संपत नाही व म्हणूनच कोलाहलाचे हलाहल पचवूनही शांतपणे झोपता येत नाही हे कवी असण्याचे अस्सल प्रारब्ध हो कविता अत्यंत ठसठशीतपणे व्यक्त करते.

‘विधान’, ‘मूळ भूमिका’, ‘उच्चार’, ‘काळोखात कासव’, ‘कालचाच ‘खेळ’, ‘तुटून संवाद’ अशा एकूण सहा कवितांच्या या पुस्तकातून जगण्यावरचे कवीचे भाष्य त्याच्या जबाबदारीच्या विधानातून प्रकट झाले आहे.

आज सारीकडेच कविता फुटत चाललेली असताना, ती कोरडी, उच्छादी होत चालली असताना, जगण्यातल्या प्रचंड वेगाने गरगर, गोंधळलेली असताना बांदेकरांच्या कवितेतील हा वेगळा आणि जबाबदार सशक्त स्वर फार फार आश्वासक आहे. ही सारीच कविता दीर्घकाळ टिकून माणसाच्या असण्यातले सत्त्व जागे ठेवणारी आहे. आजच्या मराठी कवितेत बांदेकर यांनी स्वत:ची जागा अटळपणे निश्चित केली आहे. त्यांना वगळून समकालीन कवितेवरील कोणतेही भाष्य अपुरे राहील असे खात्रीने म्हणता येते.