Description
‘काळ पुढे जात असतो, आपण शहाणे होत असतो पण… मागे वळून पाहिलं, की ओलांडून आलेल्या त्या दिवसांचा तो मनोहारी भूप्रदेश आपल्याला जाणवतो. वेडेपण घेरतं. चित्तवृत्ती अनावर होतात—नेहमीचीच सर्कस करताना एखाद्या दिवशी हत्ती बेभान व्हावा, तसं आपलं होतं. सगळं झुगारून आपण काळाच्या पिंजऱ्यापाशी येतो. अपारदर्शक वास्तवातून आतूरतेनं दूर नजर लावतो. गेलेल्या दिवसांच्या त्या अंधूक दृश्यांमुळे आपण व्याकुळ होतो. ते केवळ दृश्य थोडेच असते त्यात सूर असतात, हावभाव असतात, गंध असतो, स्पर्श असतात; सगळीच माणसं ‘आपली’ झालेली असतात…