Description
समकाळाच्या वास्तवाबरोबरच ह्या काळाचे भास-आभास, दुःस्वप्नं, विचारसंवेदना, भावना आणि गंड, लोकव्यवहार आणि जीवनशैलीला महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या संग्रहातील कविता खेव देते. करोना काळातील यातील काही अनुभव तर कवीच्या आतापर्यंतच्या भाषाप्रयोगांना कसुटे लावणारे आहेत. आजच्या राजकीय-सामाजिक उच्छादाचे हे विरूपाकार, समकालीन सातत्याचे निरंतर सत्यशोधन करण्यासाठी पिच्छा पुरवतात.