Availability: In Stock

Andharwata | अंधारवाटा

120.00

Publication Date: 01/03/1978

Pages: 151

Language: Marathi

Description

अंधारवाटा ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. जयू ह्या मध्यमवर्गीय स्त्रीला वरच्या अत्याधुनिक भ्रष्ट नीतिमत्तेच्या वर्गात ठेवून ही कादंबरी एका शहरी पोटसंस्कृतीचे अप्रतिम प्रकटीकरण करते. ह्या क्लब, डिनर, ड्रिंक्स, मुक्त लैंगिक ‘व्यवहार, उच्च राहणीमान, अपरिमित गरजा इ. व्यक्तिमत्त्व पोखरणाऱ्या व्यवहारांचा एक प्रचंड वास्तवपट ह्या कादंबरीने उभा केला आहे. ह्या व्यवहारातले ‘परदेशीपण’ देशीपणाच्या विरोधात पूर्ण उघडकीला आणले आहे.

समाजाला शोषणाऱ्या ह्या उपसंस्कृतीचा संपूर्ण सांगाडा समोर ठेवताना भेण्डे ह्यांनी पात्रे, प्रसंग, संवाद ह्यातून ह्या उपसंस्कृतीचे सर्व घटक, करमणुकी, भानगडी, लाचलुचपतीचे प्रकार, हुद्दे मिळवणे, राहणीमान उंचावणे, नवीन बायका गाठणे, सौंदर्याचा व्यापार, चाळीपासून तर गाडी बंगल्यापर्यंतचे बदल इ. नानाविध तपशिलांना ज्या मितव्ययाने आणि झपाट्याने कादंबरीच्या रूपात मांडले आहे, ते मराठी कादंबरीतंत्राच्या विकासाचा पुरावाच म्हणता येईल. संपूर्णपणे भ्रष्टतेचे व लैंगिकतेचे अंतः प्रवाह असूनही जबरदस्त सामाजिक जाणिवांनी ही कादंबरी नैतिक आशयसूत्र मांडते. अफाट क्षेत्रांना स्पर्श करूनही मध्यमवर्गीय वास्तव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पध्दतींनी प्रकट करत राहते.

Additional information

Book Author