Description
‘अनुभव विकणे आहेत’ हा रंगनाथ पठारे यांचा पहिला कथासंग्रह. १९८३ साली आनंद अंतरकर यांच्या ‘विश्वमोहिनी प्रकाशन’ या संस्थेने प्रकाशित केलेला. तरुण लेखकाच्या नवखेपणाच्या खुणा या कथांत नक्कीच आहेत. पण भविष्यात कदाचित हा लेखक बरे काही लिहू शकेल याच्या खुणा सुद्धा त्यात आहेत. पुढच्या काळात पठारे यांनी बरेच लक्ष्यवेधी कथालेखन केलेले आहे. कथनाचे अनेक प्रयोग केलेले आहेत. निवेदनाच्या अनेक शक्यता पडताळून पाहिलेल्या आहेत. त्यांची मुळे या कथांत नक्कीच दिसतात. वाचकांना त्या वेधक वाटतील आणि अभ्यासकांना त्यात प्रगल्भतेच्या प्रवासातले पडघम ऐकू येतील, असे आम्हास खात्रीने वाटते.