Description
Tivrakomal Dukkache Prakaran | तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण
निवेदन हा कथेचा आत्मा. किंबहुना कथेला गोष्ट म्हटले तर निवेदक हे त्यातले मध्यवर्ती पात्र. या संग्रहातल्या कथांतील निवेदनशैलीचे वेगवेगळे प्रयोग मराठी साहित्यात आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि सांगण्याच्या शैलीमधल्या ‘अद्भूता’ला गवसणी घालणारे आहेत. समकालीन अनुभव व आशय व्यक्त करण्यासाठी मध्ययुगीन व प्रसंगी त्यापेक्षाही जुनी मराठी भाषा रंगनाथ पठारे यांनी या कथांत वापरलेली आहे. त्यामुळे स्वभावत:च सरळ आशय तिरकस होऊन प्रकटतो व जगण्यातल्या सत्याचे एका वेगळ्या आलोकातून दर्शन घडवतो. जगण्याच्या वर्तमानाचा गुंता; त्याचे दाब, त्याचा वेग आकळण्याची आकांक्षा बाळगत एका अंगभूत वेगळ्या शैलीने या कथा प्रकट झालेल्या आहेत व म्हणूनच त्या अनन्यसाधारण अशा आहेत.