Description
नाटकाची लय, त्यात येणारे सततचे आत्ताचे संदर्भ आणि त्यातून निर्माण होणारी निरर्थकता जनक नाटकात दिसते. एकीकडे हे नाटक या गोष्टींवर भाष्य करतं तर दुसरीकडे एका पारंपरिक कुटुंबातल्या दोन पिढ्यांची गोष्ट पण सांगतं. बाप, मुलगा, आई, सून, यांच्यातलं इक्वेशन बदलत जातं. जसजसे प्रसंग पुढे जातात या पात्रांची भाषा बदलते. वेष बदलतो. कधी सिरियलची भाषा सोडून मध्येच ते रावडी भाषा बोलू लागतात. पण कुटुंब म्हणून ते एका धाग्याने बांधलेले दिसतात. त्यातल्या भावनिक आणि परंपरा सांभाळणारा धागा कायम राहतो. आणि तरीदेखिल एक मध्यमवर्गीय पापभिरू कुटुंब वेळ पडल्यावर क्रांतीसाठी देखिल सज्ज होतं. आणि त्यात स्त्रिया ज्यास्त न घाबरता पुढाकार घेतात, हे पटतं आणि आवडतं देखिल.
– मनस्विनी लता रवींद्र